नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया संस्थेतर्फे स्थानिक प्रशासनात संगणकीय प्रणालीच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी देण्यात येणारा सीएसआय 2020 पुरस्कार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या उपस्थितीत लखनऊ येथे जिल्हा सूचना विज्ञान केंद्रास प्रदान करण्यात आला. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धमेंद्र जैन यांनी हा पुरस्कार स्विकारला.
कोरोनाकाळात संगणकीय प्रणालीचा उपयोग करीत आरोग्यदर्शक मॅप आणि प्रतिबंधीत क्षेत्र व रुग्णालयांचे जीआयएस मॅपिंग करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना या यशाबद्दल श्री.जैन व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.