नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबारद्वारा  सन 2018, 2019 व 2020 या तीन वर्षांसाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार  जाहीर करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या हस्ते  व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व  दहा हजार रुपये रोख स्वरुपात प्रदान करुन  खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे.

2018 वर्षांसाठी जिल्हा गुणवंत संघटक म्हणून पुष्पेंद्र रघुवंशी तर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून शांताराम दिपा मंडाले, 2019 वर्षांसाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक शेख वसीम शेख सुव्हान, गुणवंत पुरूष खेळाडू हेमचंद्र मराठे, गुणवंत महिला खेळाडू  चिन्मयी  चव्हाण, गुणवंत दिव्यांग खेळाडू विकास बेलदार, 2020 वर्षांसाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक मिनल कुमार वळवी, गुणवंत पुरुष खेळाडू गोपाल चव्हाण, तर गुणवंत महिला खेळाडू म्हणून निहती गुमाणे यांना गौरविण्यात येणार आहे, असे  जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.