नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार 23 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9.00 वाजता हॉटेल कृष्णाई, साक्री रोड धुळे येथून नंदुरबारकडे प्रयाण. 10.30 वा. सर्कीट हाऊस नंदुरबार येथे आगमन. 11.00 वा. नंदुरबार शहरातील विविध चौकात शिवसेना नामफलकाचे अनावरण. 11.30 वा. नंदुरबार, नवापूर, शहादा विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 2.00 वा. धडगांव येथे आगमन व भोजन. 2.30 वा. धडगाव शहरातील विविध ठिकाणी शिवसेना नामफलकाचे अनावरण. 3.00 वा. धडगाव तालुका पदाधिकारी मेळाव्यास उपस्थिती.
सायंकाळी 6.00 वा. अक्कलकुवा येथे आगमन. 6.30 वा. अक्कलकुवा येथील शैक्षणिक संकुलास भेट. 7.30 वा. मु.कोयली विहिर अक्कलकुवा येथे जिल्हाप्रमुख आमशादादा पाडवी यांच्या कन्येच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थिती.
रात्री 8.00 वाजता अक्कलकुवा येथून नंदुरबारकडे प्रयाण. 9.00 वा. सर्कीट हाऊन नंदुरबार येथे आगमन व मुक्काम.
गुरुवार 24 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता सर्कीट हाऊस नंदुरबार येथून दोंडाईचा मार्गे धुळ्याकडे प्रयाण.