नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेर समाविष्ट असलेल्या 519 ग्रामपंचायती व अनुसूचित क्षेत्राबाहेरील 76 ग्रामपंचायती अशा एकूण 595 ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच पदाचा 17 डिसेंबर 2020 रोजी बिरसामुडा सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे होणारा आरक्षण सोडत कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
ग्राम विकास विभागाच्या निर्देशानुसार सरपंच सोडत कार्यक्रम हा राज्य निवडणूक आयोगाच्या माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या घोषीत निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर 15 जानेवारी 2021 नंतर राबविण्यात येणार असल्याने 17 डिसेंबर रोजीचा आरक्षण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सुधारीत आरक्षण सोडतीची तारीख लवकर कळविण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन ) बालाजी क्षीरसागर यांनी कळविले आहे.