नंदुरबार – राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 31 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2.30 वाजता नाशिक येथून सारंगखेडाकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता अत्याचारग्रस्त मुलीच्या कुटुंबियांची भेट. 6.30 वाजता सारंगखेडा येथून नंदुरबारकडे प्रयाण व नंदुरबार येथे मुक्काम.
रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता शहादाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता शहादा येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समवेत शासकीय विश्रामगृह शहादा येथे जिल्ह्यातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा, त्यानंतर सोईनुसार नंदुरबारकडे प्रयाण.
सोमवार 2 नोव्हेंबर 2020 रोजी नंदुरबार येथे राखीव. गुरुवार 5 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता नंदुरबार येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे आयोजित रॅलीत सहभाग. सायंकाळी 4.00 वाजता वाहनाने जळगावकडे प्रयाण.