नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात आजाराची लक्षणे आढळलेल्या 259 व्यक्तिंची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 33 कोरोना बाधित आढळले आहेत. या टप्प्यातील सर्वेक्षणात जे कुटुंब बाहेरगावी गेले होते त्यांचीदेखील आरोग्य तपासणी करण्यात आली.
दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी 6913 व्यक्तींना रक्तदाब, 105 कर्करोग, 4972 मधुमेह, इतर आजार 989 आणि 218 व्यक्तींना खोकला असल्याचे आढळून आले. 212 व्यक्तींना ताप, 12 घसादुखी तर 2 व्यक्तींमध्ये एसपीओ-2 चे प्रमाण 95 पेक्षा कमी आढळले. यापैकी 355 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आणि यापैकी 73 टक्के व्यक्तिंची स्वॅब चाचणी करण्यात आली. सर्वेक्षणात आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील 3 लाख 66 हजार 721 घरांना भेटी दिल्या. एकूण 18 लाख 72 हजार 775 लोकसंख्येपैकी 16 लाख 95 हजार 625 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यात अक्कलकुवा 2 लाख 47 हजार 183, धडगाव 2 लाख 30 हजार 709, नंदुरबार 3 लाख 48 हजार 169, नवापूर 2 लाख 84 हजार 243, शहादा 4 लाख 9 हजार 855 आणि तळोदा तालुक्यातील 1 लाख 75 हजार 466 नागरिकांचा समावेश आहे.