नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा 6 लाख पर्यंत वाढविण्यात आली आहे.
सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,नवापूर रोड नंदुरबार ( दूरध्वनी क्रमांक-02564-210303) येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.