नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना किंवा अभ्यागतांना जिल्हाधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्यांची भेट घेता येणार नाही. नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे निवेदन द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
नागरीकांनी आपला अर्ज किंवा निवेदन [email protected] या ईमेलवर पाठवावे किंवा 8888137967 या क्रमांकावर व्हॉट्सॲप द्वारे सादर करावे.