नंदुरबार:- तळोदा येथील प्रेमविवाह प्रकरणातून तरुणाला मारहाण करणाऱ्या नातलगांना न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत प्राप्त माहितेनुसार या घटनेतील दुखापत झालेल्या तरुणाने आरोपी परिवारातील मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर आरोपी व दुखापती तरुण यांचे परीवारातील सदस्यांमध्ये जातीरीतीरीवाजाप्रमाणे बैठक बसवुन तंटा आपसात मिटवुन घेण्यात आला होता व मुलीस तिचे वडील यांचेकडे सोपविले होते. दरम्यान आरोपी हे संबंधित तरुणाला वारंवर जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यातच दि .०५ मे २००७ रोजी सकाळी ११.३० वाजताचे सुमारास तळोदा गावात साजन टेलर्स या दुकानासमोर अलीम मलिक हुसेन, सोहेब मलिक हुसैन सुलतान, मलक नईम मलक अफजल ( मयत ), मलक विकार मलक रहेमान, मलक रहीम मलक हुसेन, मलक सुलतान मलक हुसेन, मलक हसीम मलक अफजल आणि अहमदखान रहेमानखान पिंजारी सर्व रा . मलकवाडा तळोदा जि.नंदुरबार या सर्वांनी हातात लाकडी डेंगारे , लाठया काठया व लोखंडी चैन घेवुन अनिस ईस्माइल बागवान याने आपल्या मुलीसोबत प्रेम विवाह केल्याच्या रागातुन मारहाण केली होती. यात अनिस यांचे डोके फुटुन तो रक्तबंबाळ झाला होता. नंतर जखमी अनिस यास काही लोकांनी आरोपीतांच्या तावडीतुन सोडवुन त्यास उपचारकामी दवाखान्यात दाखल केले होते. याप्रकरणी अनिस याचा भाऊ रईस ईस्माइल बागवान याच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री . एस . डी . हरगुडे यांच्या कोर्टात होवून आरोपी यांचेविरुध्द गुन्हा शाबित होवुन आरोपी क्र .३ मयत झाल्याने उर्वरित आरोपी क्र. १ ते २ व ४ ते ८ यांना न्यायालयाने ६ महिने सश्रम कारावास तसेच प्रत्येकी रुपये ३५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपीविरुध्द यायालयात दोषारोपपत्र पौनि सैय्यद यांनी सादर केले होते. या खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील अॅड . श्री . धिरजसिंह चौहान यांनी पाहीले. पैरवी अधिकारी म्हणुन असई रमेश माळी यांनी कामकाज केले. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत व अपर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी यांनी तपास अधिकारी व सरकारी अभिव्यक्ता यांचे अभिनंदन केले आहे .