नंदुरबार (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा पाचने वाढून १०७ एवढी झाली आहे. आज सायंकाळी प्राप्त १३ पॉझीटीव्ह अहवालांनंतर पुन्हा ५ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आजची रुग्णसंख्या १८ झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोणा विषाणु बाधीतांच्या संख्येत दररोज वाढ होत असुन जिल्ह्यातील कोरोणा बाधीतांची संख्या आता १०७ झाली आहे. आज सायंकाळी १३ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. रात्री पुन्हा ५ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आता ही संख्या१०७ वर पोहचली आहे. यातील ५२ जण उपचार घेवुन परतले असुन ४७ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर दोघांवर धुळे येथे उपचार सुरु आहे. तर यातील ०६ जणांचा मृत्यु झाला आहे. आज आढळलेल्या १८ रुग्णांमध्ये मोलगी येथील २ रुग्णांमध्ये पुरुष ४०. महिला ७, नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील १ पुरुष ४३, तर तळोदा येथील ५ पुरुष ३३,२९,५४,५१,४५ तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील ६ पुरुष २७,२९,३०,३०,३२, ३० आणि ४ महिला ३०,२९,४१,३१ अशांचा समावेश आहे.