नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिना’ निमित्त दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.
या प्रसंगी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत,अविश्यांत पांडा, तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, कैलास कडलग यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवादविरोधी प्रतिज्ञा घेतली. अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला