नंदुरबार : लॉकडाऊन परिस्थितीत बेरोजगार झाल्याने राज्यातून किंवा परराज्यातून स्थलांतरीत झालेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या सर्व प्रकारच्या आदिवासी जमातीतील मजुरांना भोजनाची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेले धान्य खुल्या बाजारात न विकता आदिवासी मजुरांना वाटप करण्याचा शुभारंभ पालकमंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.
महामंडळाकडील धानाची भरडई करून पॅकिंग केल्यानंतर धान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. भरडई होईल तसे हे धान्य वितरीत करण्यात येणार आहे. सबंधित जिल्ह्यांच्या मागणीनुसार हे धान्य देण्यात येणार आहे. यामुळे संकटात सापडलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.