नंदुरबार : कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांसाठी पोषण इंडिया कार्यक्रमांतर्गत व्हीएसटीएफ आणि प्लॅन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पीपीई किट्स आणि इतर साहित्य जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी प्रातिनिधीक स्वरुपात हे साहित्य स्विकारले. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. साहित्यात 250 पीपीई किट्स, 250 एन-95 मास्क, 3000 ट्रीपल लेयर मास्क, अल्कोहल हँड रब (500 मिली) 500, अल्कोहल हँड रब (100 मिली) 500, 1 लाख साबण, 5 थर्मल स्कॅनर आदींचा समावेश आहे. कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या साहित्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने चांगली मदत होईल, असा विश्वास डॉ.भारुड यांनी यावेळी व्यक्त केला.