नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र दिन हा 1 मे 2020 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे अत्यंत साधेपनाने आयोजित करण्यात येणार आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार या दिवशी फक्त जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या ठिकाणी वर्धापन दिन समारंभ करण्यात येणार असल्याने इतर कुठल्याही कार्यालयात महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये. कार्यक्रमाच्या ठिकाणी केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी असे निवडक अधिकारी उपस्थित राहतील, असे उपजिल्हाधिकारी कैलास कडलग यांनी कळविले आहे.