अक्कलकुवा (प्रतिनिधि) :- तालुक्यातील खापर ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री सहायता निधि मध्ये ५५,५५५ रु मदत म्हणून देण्यात आले आहेत. जगभरासह देशात व राज्यात कोरोना विषाणूचा पादुर्भाव वाढला आहे. या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राबरोबरच राज्य शासनाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्याअनुषंगाने अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्रामस्थांना मुख्यमंत्री सहायता निधिसाठी सोशल मिडिया व्हाट्सएप्प व फेसबुकच्या माध्यमानतुन निधि संकलनासाठी माजी उपसरपंच ललित जाट व लक्ष्मण वाडिले यांनी आवाहन केले होते. यावेळी खापर गावातील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, जेष्ठ, युवक व महिलांनी सकारत्मक प्रतिसाद देत मोलाच्या हातभार लावला व आपल्या यथाशक्ति निधि संकलन करण्यात आली.
ग्रामस्थान कडून एकूण ५७,९१५रु एवढी निधि जमा झाली होती. त्यातून ५५,५५५रु (पंचवान हजार पाचशे पंचवान रूपये) मुख्यमंत्री सहायता निधि मध्ये आरटीजीएस च्या माध्यमाने देण्यात आली. तसेच उर्वरित रक्कम २३६०रु खापर येथील विलगिकरण केंद्रातील लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेत मदत करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी केलेल्या या निधी संकलनाबाबत निवासी नायब जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या कड़े मुख्यमंत्री सहायता निधिची व दात्यांची संपूर्ण माहिती सोपवण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच ललीत जाट, लक्ष्मण वाडिले, अक्षय सोनार आदि उपस्थित होते.