नंदुरबार :- गुजरात राज्यातून महाराष्ट्रात आणलेला सुमारे 34 लाख रुपयांचा गुटखा नंदुरबार पोलिसांनी हस्तगत केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी सुरू केलेल्या “ऑपरेशन वॉश आउट” चे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून, पोलिसांनी ही कार्यवाही सुरू केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे .
सध्या संपुर्ण जगभरासह भारतात थैमान घातलेल्या कोराणा विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने संपुर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत केलेले आहे . नंदुरबार जिल्हात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून खबरदारीच्या सर्व उपाय योजना राज्य शासन युध्द पातळीवर करीत आहे. यातच महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा गुजरात राज्यातुन नंदुरबार जिल्ह्यात आणुन लॉकडाऊनचा फायदा घेवुन त्याची जास्त दरात विक्री होत होता. त्यानुसार आज दिनांक १६ एप्रिल २०२० रोजी गुजरात राज्यातुन निझरमार्गे नंदुरबार येथे मोठया प्रमाणात विमल गुटखा वाहतुक होणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दिनांक १५ रोजी रात्री ११ वाजेपासुन निझर रोडवर मन्सुरी टेन्ट हाऊसजवळ सापळा लावला. आज दि . १६ रोजी सुमारे पहाटे ०१ . ३० वाजेच्या सुमारास निझर गावाकडुन एक हायवा डंपर नंदुरबारच्या दिशेने येताना दिसला. म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या सहाय्याने वाहनास उभे करण्याचा इशारा दिला असता संशयीत वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेला , म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची खात्री झाल्याने सदर वाहनाचा पाठलाग करुन शिताफीने वाहनाला थांबवुन डंपरमध्ये चालक व सोबत ३ इसम बसलेले दिसले. त्यात आकेश काशिनाथ नाईक वय – २४, २ ) मनिष गणेश ठाकरे वय – २०, ३ ) नरेश विनोड पाडवी वय – २१, ४ ) राहुल भिका पाडवी वय – १९ सर्व रा . नळवा बु . ता . जि . नंदुरबार यांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत विचारले असता वाहन चालक उडवा उडवीची उत्तरे देवुन खोटे बोलत असल्याचे निदर्शनास आले , परंतु त्यांना पोलीसी खाक्या दाखवुन वाहनाची तपासणी केली असता, त्यात पांढऱ्या व खाकी रंगाचे पोते दिसल्याने त्यांना उघडुन पाहिले असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा मिळुन आल्याने विमल गुटखा व डंपर बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा डंपर नरेंद्रसिंग राजपुत यांचा असुन त्याने विमल गुटखा गुजरात राज्यातील निझर येथुन होलाराम सिंधी यांच्या गोडावुन मधुन भरुन माल कुठे उतरवायचा बाबत डंपर मालक नरेंद्रसिंग राजपुत त्यांना नंदुरबार येथे पोहचल्यावर सांगणार होता व त्यावेळेस नरेंद्रसिंग राजपुत हा ब्रिझा चारचाकी वाहन क्रमांक ७१०० ने डंपरच्यापुढे चालवत होता.
ताब्यात घेण्यात आलेल्या डंपरमध्ये ७ लाख ५३ हजार ६०० रुपये किमतीचा विमल पान मसाला गुटख्याचे ३० खाकी रंगाचे पोते १ लाख ८८ हजार ४०० रु . किं . चा V – १ तम्बाखूचे ६ पांढऱ्या रंगाचे पोते ३ ) २५ लाख रुपये किमतीचा हायवा कंपणीचा डंपर विमल वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला व २५ हजार रुपये किमतीचा इतर मुद्देमाल असा एकुण ३४ लाख ६७ हजार रुपये किमतीचा एकुण मुद्देमाल जप्त केला. ब्रेझा चालक व डंपर वाहनाचा मालक नरेंद्रसिंग राजपुत, होलाराम सिंधी यांचेविरुध्द् उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किशोर नवले , पोलीस उप – निरीक्षक योगेश राऊत, पोहेकॉ प्रदीपसिंग राजपुत, दिपक गोरे, पोना युवराज चव्हाण, अविनाश चव्हाण, पोशि पुरुषोत्तम सोनार , शोएब शेख यांचे पथकाने केली असून, पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत यांनी संपुर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.