नंदुरबार (जिमाका वृत्त) : नंदुरबार जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज (22 जुलै 2023) रोजी जिल्हा नियोजन भवनाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी दिली आहे.
आज( 22 जुलै 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संपन्न होणाऱ्या या जिल्हा नियोजन भवनाच्या उद्घाटन समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, विधान परिषद सदस्य सर्वश्री अमरीश पटेल, किशोर दराडे, आमश्या पाडवी, सत्यजित तांबे, विधानसभा सदस्य सर्वश्री अॅड. के. सी. पाडवी (अक्कलकुवा), शिरिषकुमार नाईक(नवापूर), राजेश पाडवी (शहादा) जिल्हाधिकारी मनीषा खत्री हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी केले आहे.