नंदुरबार (जिमाका वृत्त): भारतीय सैन्यदल,नौदल व वायुदलामध्ये दलातील अधिकारी पदाच्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी ) परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी 19 मे,2023 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी ) या परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी 29 मे ते 7 जून, 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक 53 साठी प्रशिक्षण देण्यात येईल. एस.एस.बी प्रवेशासाठी कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिेसेस (सीडीएस) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी परीक्षा (एन.डी.ए ) पास झालेली असावी. व त्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र असावे. एन.सी.सी ‘सी’ सटिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये उमेदवार पास झालेला असावा. एनसीसी ग्रुप हेडर्क्वाटरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी नियुक्ती पत्र असावे. तसेच विद्यापीठ एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबी साठी शिफारस यादीत नावे असणारे उमेदवार पात्र राहील. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शूल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे सोमवार 19 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येतांना विद्यार्थ्यांनी https://www.facebook.com/DSW.Maharashtra या फेसबूक वरील वेब पेजवर सैनिक कल्याण विभाग,पुणे वर सर्च करुन त्यामधील एसएसबी-53 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत आणावी.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 ईमेल [email protected] वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.