नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोविड-19 च्या अनुषंगांने सुधारीत सुचना व शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील खेळाडूसाठी सुरू असलेल्या प्रशिक्षण संस्था व वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाशी संबंधित संस्था सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे.
कोविड-16 विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाच्या वतीने विहित केलेले शारिरीक अंतराचे तसेच संसर्ग न पसरण्याबाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. मार्गदर्शक सूचनाचे यापुर्वीच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार संबंधित घटना व्यवस्थापक व पोलीस प्रशासनास देण्यात आले आहेत.
सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.