नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याच्या विक्री केंद्रावर मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी ग्रामबिजोत्पादनातून उत्पादीत सोयाबीन बियाणे तांत्रिक पद्धतीने साठवणूक करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

 खरीप हंगाम 2020 मध्ये 20990 हे.पेरणी क्षेत्र असून 2021 मध्ये 21510 हेक्टर पेरणी क्षेत्र निश्चित केले आहे. बियाणे उत्पादनाठी कृषी विभागासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. ग्रामबिजोत्पादन  कार्यक्रमाच्या माध्यमातून सोयाबीन बियाणे प्रक्षेत्र भेटी, काढणी, मळणी, साठवणूकीबाबत उत्पादक शेतकरी यांचेशी समन्वय साधून नियोजन करण्यात आले आहे.