नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाकडील विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेतात शेडनेट उभारणीसाठी अर्थसहाय्य देणे योजनेसाठी तळोदा,अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याकडून 19 जानेवारी 2022 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहे.
या योजनेतंर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या निर्यातक्षम पिकांच्या लागवड करुन ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वंयरोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच फलोत्पादन क्षेत्रात बिगर हंगामी पिके घेण्यासाठी व उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणेसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2020-2021 च्या मार्गदर्शक सूचनानुसार शेडनेट उभारणीसाठी येणाऱ्या खर्चांच्या 90 टक्के अनुदानाची रक्कम प्रकल्प कार्यालयामार्फत देण्यात येईल. व उर्वरित 10 टक्के अनुदानाची रक्कम लाभार्थी हिस्साचा खर्च असेल.
योजनेसाठी शेतकरी अनुसूचित जमातीचा कृषी पदवीका धारक असावा. लाभार्थीच्या नावे सातबारा उतारा व वनहक्क कायद्यातंर्गत प्राप्त वनपट्टा दाखला असावा. विधवा, परितक्त्या स्त्रिया, दिव्यांग असल्याचा दाखला. जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) दाखला व प्रमाणपत्र, सरपंच, ग्रामसेवक रहिवास दाखला, बॅक पासबूक अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, ग्रामसभेचा ठराव, तसेच यापुर्वी या योजनाचा लाभ आदिवासी विकास विभाग अथवा अन्य विभागामार्फत न घेतल्याचे स्वघोषणापत्र, प्रतिज्ञापत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
योजनेच्या अधिक माहिती व अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा जि. नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.