नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद अनुदानित, नगरपालिका शाळेतील मुख्याध्यापकांनी सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात विविध शिष्यवृत्तीबाबतचे प्रस्ताव 31 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावयाचे आहेत.
जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद कार्यालयामार्फत माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पाल्यांची शिष्यवृत्ती, 9 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीचे मुले व मुलींची शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती, विजाभज, विमाप्र मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती, इमाव मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना तसेच इतर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मंजूर केली जाते. मुख्याध्यापकांनी यासंबंधित प्रस्ताव 31 जानेवारीपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगावकर यांनी केले आहे.