नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियांन (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी, पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी प्रती हेक्टरी 30 हजार प्रती लाभार्थी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यास 15 हेक्टर क्षेत्राकरिता 4 लाख 50 हजाराचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. वैरणीसाठी शेवगा लागवड योजनेअंतर्गत प्रती हेक्टरी 7.5 किलो शेवगा (पीकेएम-1) बियाण्याची किंमत 6 हजार 750 व उर्वरित 23 हजार 250 अनुदान लाभार्थ्यांनाहे दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यात येईल. यात पशुपालकांना बियाण्याचा थेट पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्चासाठी देण्यात येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी, पशुपालक यांनी संबंधित जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ,जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती आणि नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.