नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : तालुका स्तरावर विविध उपक्रमांद्वारे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात यावा. या दिवशी चुनाव पाठशालासारखे मतदारांचे प्रबोधन करणारे उपक्रम आयोजित करण्यात यावे, असे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सांगितले.
मतदार दिवसाच्या आयोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय बागडे तसेच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिवसापासून ई-एपिक सुविधा सुरू होत असून प्रातिनिधीक स्वरुपात मतदारांचे एपिक डाऊनलोड करणे व मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती असल्यास ई-सुविधेद्वारे आवश्यक बदल करणे असे कार्यक्रम या दिवशी घेण्यात यावे. मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे श्री.पाटील यावेळी म्हणाले.