नंदुरबार (प्रतिनिधी) – माध्यमिक विद्यात्मय दुधाळे, येथे विज्ञान दिनानिमित्त मुख्याध्यापक एस.एच. ठाकरे यांच्या हस्ते सर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच विज्ञान शिक्षिका श्रीमती, रोहिणी भदाणे यांनी विद्यार्थाना विज्ञानाच्या प्रयोगातून कागदावर भुत उतरवणे, जळता कापुर गिळणे, कलशात भुत उतरवणे, न बघता अंक ओळखणे इत्यादी अंधश्रध्देवर आधारित प्रयोग दाखविण्यात आले व भोंदुबाबा यातुन आपली कश्याप्रकारे फसवणुक करताल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास कमलेश दादा अहिरे, पवार सर, सोनवणी मॅडम , वाघ सर, राजवाडे मॅडम, कोळी सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी पुरुषोतम हिरे, गणेश पवार उपस्थित होते.
राष्ट्रिय विज्ञान दिनानिमित्त अंधश्रद्धे विषयी विदयार्थामध्ये जनजागृती.
