नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : संघ लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्व परिक्षा 2020 चा निकाल 23 ऑक्टोंबर रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला असून उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेकरिता एकरकमी 50 हजार रुपयाचे अर्थसहाय्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी ) मार्फत देण्यात येणार आहे.
बार्टीच्या संकेतस्थळावर यासाठीचे निकष आणि अर्ज उपलब्ध असून अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडून बार्टीच्या ई-मेल वर 8 डिसेंबर 2020 सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पाठवावे . या योजनेचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले आहे.