नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-2023 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना  लागू करण्यात आलेल्या वीजदर सवलतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची मुदत  31 मे 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. 

वीजदर सवलतीचा अर्ज आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असून 27 अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांनी नोंदणी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकारे करु शकतात. ऑफलाईनद्वारे सादर करावयाचा अर्ज भरुन आयुक्त वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे सादर करावा.

 यंत्रमाग धारकांनी नोंदणी अर्ज केल्याशिवाय त्यांना वीजदर सवलतीचा लाभ देता येणार नाही असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.