नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पात्र लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahadiscom.in/solar/ या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.