नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाकडील सन 2014-2015 करिता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शेळी गट पुरवठा योजनेचा लाभ देण्यासाठी नोंदणीकृत आदिवासी महिला बचत गटाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शेळी गट व्यवसायासाठी बचत गटातील सर्व सदस्य अनुसूचित जमातीचे असावे. लाभार्थी गट नोंदणीकृत असावा. अर्जासोबत बचत गट स्थापनेचा ठराव, सदस्याची यादी, गटातील सदस्याचे जातीचे दाखले, रहिवाशी दाखले, फोटो, आधार कार्ड, बचत गटाचे नावे असलेले बँक खाते क्रमांक, सर्व सदस्याचे दारिद्र्य रेषेखालील उत्पन्न दाखला, यापूर्वी इतर योजनेतून लाभ न घेतल्याचा दाखला, ग्रामसभेचा ठराव, वाड्यासाठी जागा उपलब्धेचा दाखला, एका सदस्याचे नावे सातबारा उतारा असणे आवश्यक राहील.
पात्र लाभार्थ्यांनी 25 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवापूर रोड नंदुरबार येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.