नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  : जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त सुदंरसिंग वसावे यांनी केले आहे.

सन 2020-2021 शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टल 3 डिसेंबर 2020 पासून सुरु करण्यात आले आहे. प्रवेशित अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विजाभज, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी  तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, विद्यार्थी, पालक यांनी  पात्र विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क योजनेचे नवीन प्रवेशित व नुतनीकरणाचे परिपूर्ण अर्ज महाविद्यालयांनी तपासून 31 मार्च 2021 पर्यत कार्यालयाकडे ऑनलाईन सादर करावे.