नंदुरबार : सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व आस्थापना तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना (ज्यांच्याकडे 25 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी ) कार्यरत आहेत अशा उद्योग आस्थापना, व्यापार, व्यावसायिक, कारखाने इत्यादी यांनी त्यांच्याकडील कार्यरत मुनष्यबळाची त्रैमासिक माहिती 30 एप्रिल 2020 पर्यंत विभागाचा www.mahaswayam.gov.in संस्केतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रा. म. कोल्हे यांनी केले.
जानेवारी ते मार्च या कालावाधीचे आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र इ-आर-1 या विभागाचा संस्केतस्थळावरील रोजगार या ऑप्शनमधील नियुक्तेवर क्लिक करुन युजर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने अंतिम दिनांक 30 एप्रिल 2020 पर्यंत भरावयाची आहे . या बाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक 02564/210026 वर संर्पक साधावा आणि रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणारा कायदा 1959 नियमावली 1960 च्या अधिनियमातील तरतुदीचे पालन करावे, असेही श्री. कोल्हे यांनी कळविले आहे.