नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार येथील न ता वी समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा डॉ कैलास चौधरी यांनी बी एड च्या विद्यार्थी शिक्षकांना व TET परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल असा अँप तयार केला आहे सदर अँप हा निशुल्क Google play store वरून डोवनलोर्ड करू शकतात त्यात बी एड चे सर्व विषय अध्यापन केले असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व B Ed च्या अध्ययनर्थ्यांना प्रथम व द्वितीय वर्षाचे व्हिडीओ वाचन साहित्य, ऑनलाइन परीक्षेची तयारी इत्यादी .बाबी उपलब्ध करून दिल्या आहेत.
सदर अँप मध्ये TET परीक्षेचे सर्व अभ्यासक्रमानुसार विडिओ व वस्तुनिष्ठ परीक्षेची तयारी करण्यात येणार आहे तसेच इंग्रजी व्याकरणाचेही विडिओ सदर अँप वर उपलब्ध आहे म्हणून विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे
तरी विद्यार्थ्यांना सदर अँप चा उपयोग करता येईल सदर अँप ची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.bed.beddigital अॅप संदर्भातील माहिती व शंका साठी खालील telegram group ला joining करावे. https://t.me/joinchat/MTrNHVLkUmY4ZGNlअसे आवाहन प्रा डॉ कैलास चौधरी यांनी केले आहे.
तत्पूर्वी सदर अँप संस्थेचे समन्वयक डॉ एम एस रघुवंशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मुकेश रघुवंशी जी टी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एस श्रीवास्तव विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन डी चौधरी जी टी पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एम जे रघुवंशी व जी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एन जे सोमाणी सर आदींच्या हस्ते सदर अँपचे लोंचिंग करून सदर अँप विद्यार्थ्यांसाठी प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आले या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कॉव्हिडं 19 मुळे उद्भवणाऱ्या समस्येवर उत्तम असा मार्ग डॉ कैलास चौधरी यांनी शोधून काढला आहे सदर अँप चा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा असे आवाहन केले
संस्थेचे चेअरमन मा मनोजजी रघुवंशी यांनी या स्तुत्य कार्याबद्दल डॉ कैलास चौधरींचा अभिनंदन केले आहे.
डॉ. कैलास चौधरी यांनी आपल्या मनोगत मधून अॅपविषयी माहिती दिली. व लॉकडाऊनचा उपयोग अॅप विकसाच्या कामात आला असल्याचे त्यांनी सांगितले. अॅप निर्मितीसाठी त्यांना तांत्रीकबाबीसाठी HRD web tech चे रितीका चव्हाण, दीपक अहिरे, कुणाल चव्हाण व सागर राजपूत यांनी सहकार्य केले. त्यांचेही त्यांनी आभार मानलेत. क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बी.एड. TET व इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करु पाहणार्या विद्यार्थ्यांनी या अॅपचा उपयोग अवश्य करावा असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. एन. जी. वसावे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यायातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.