नंदुरबार (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा निंबोणी ता जि नंदुरबार येथे आज दिनांक 15/10/2024 रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय परसबाग तपासणी साठी व पाहणी करण्यासाठी आपल्या तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी या.श्री एस.एन.पाटील साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी मा.जाधव साहेब यांनी भेट दिली.शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय परसबाग निमिर्तीसाठी आम्ही शालेय परिसरात सुंदर अशी परसबाग तयार करून त्यात सेंद्रिय खत टाकून विविध प्रकारचे भाजीपाला, फळभाज्या यांची लागवड केलेली आहे.भेंडी,वांगी,कारली,दोडकी, टमाटे अंबडचुका ,पालक मेथी ,दुधीभोपळा, कडीपत्ता, कोथिंबीर इत्यादी भाजीपाला लागवड करुन उत्पादीत भाजीपाला शालेय पोषण आहार मध्ये टाकून विद्यार्थ्यांना दिला जातो.शालेयपरिसर अतिशय सुंदर असा असून स्वच्छ आणि शैक्षणिक वातावरणाची निर्मिती करणारा आहे.शाळा असावी तर अशी. सर्व शालेय पोषण आहार योजना चे रेकॉर्ड अद्यावत आहे एकंदरीत शाळा भौतिक सुविधांची नटलेली आहे शालेय परिसरात हिरवीगार झाडी, यामध्ये अनेक प्रकारची सुवासिक फुले,अनेक प्रकारची औषधी वनस्पती ची लागवड केलेली आहे.शालेय भौतिक सुविधा,शालेय गुणवत्ता ,शालेय अभिलेखे अद्यावत अशा सर्व गुणसंपन्न असलेली शाळा पासून साहेबांनी दोघं शिक्षकांचे कौतुक केले व Very good चा अभिप्राय देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.