नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : पशुपालकांच्यादृष्टीने पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळा ह्या गैरसोयीच्या होत असल्याने 7 जानेवारी पासून राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-1 श्रेणी-2, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, तसेच फिरते पशुवैद्यकीय दवाखाने दोन सत्राऐवजी सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत ( जेवणाची सुट्टी दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत) आणि शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील. आकस्मिक प्रसंगी 24 तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. पशुपालकांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.