नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मा. भारत निवडणूक आयोगाने नाशिक व अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच औरगांबाद, नागपूर व कोकण विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी सर्वसमावेशक सूचनांप्रमाणे 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर नव्याने मतदार याद्या तयार करण्याबाबतचा कार्यक्रम घोषित केला आहे.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम असा : शनिवार 1 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल. शनिवार 15 ऑक्टोंबर 2022 रोजी मतदार नोंदणी अधिनियमान्वये वृत्तपत्रात नोटिसीची प्रथम पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल. मंगळवार 25 ऑक्टोबर 2022 रोजी द्वितीय नोटीस पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल. नमुना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्यांचा अंतिम दिनांक सोमवार 7 नोव्हेंबर 2022 असेल. शनिवार 19 नोव्हेंबर 2022 रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्याची छपाई करण्यात येईल. बुधवार 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल.
बुधवार 23 नोव्हेंबर 2022 ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येईल. रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येईल. शुक्रवार 30 डिसेंबर 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.