नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्यामार्फत माजी सैनिक, विधवा यांच्या व्यावसायीक शिक्षण घेत असलेल्या पाल्यांनी सन 2020-2021 साठी पंतप्रधान शिष्यवृत्ती (पीएमएसएस ) करीता अर्ज करावे असे आवाहन असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
पंतप्रधान शिष्यवृत्ती (पीएमएसएस ) योजनेअंतर्गत सन 2020-2021 साठी मुलींना 36 हजार तर मुलांना 30 हजार रुपयांची आर्थिक शिष्यवृत्ती दरवर्षी शिक्षण पूर्ण होईपर्यंत देण्यात येते. शिष्यवृत्तीकरीता इयत्ता 12 वी किंवा डिप्लोमामध्ये 60 टक्क्यांच्या वर गुण असणे आवश्यक आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पात्र पाल्यांनी 31 डिसेंबर 2020 पर्यंत www.ksb.gov.in ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक विश्रामगृह आवार, संतोषी माता चौक जवळ,धुळे येथे सादर करावे.