नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महिला व बाल विकास विभागाच्या संकल्पनेतून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवीत आहे. युवतींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे, लढण्याचे प्रशिक्षण देवून त्यास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी के.डी.गावित नर्सिग स्कुल महाविद्यालय,पथराई येथे नुकतेच राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण संपन्न झाले.
या कार्यक्रमांस जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी, साईनाथ वंगारी, सर्व तालुकास्तरीय बाल विकास प्रकल्प अधिकारी, भारतीय स्त्री शक्ती संस्थेचे कल्याणी डांगे, विद्यार्थी निधी ट्रस्टचे वर्षा घाटकडवी, ऑल महाराष्ट्र तायदो असोसिएशनचे संतोष मराठे उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षणातंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 1 हजार युवतींना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात 3 जुलै, 2023 ते 15 जुलै,2023 या कालावधीत जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी संघटना यांच्यावतीने 15 ते 30 वयोगटातील युवतींच्या स्वसंरक्षणासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी श्री.मराठे यांनी युवतींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षणही देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचलक श्री.रविंद्र काकलीज तर प्रस्तावना श्री.वंगारी यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती सुरेखा पवार यांनी केले.