नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): ऊर्जा मंत्रालय,भारत सरकार यांचेमार्फत आझादी का अमृत महोत्सवांतर्गत सोमवार 25 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता तहसिल कार्यालय, नंदुरबार येथे तसेच आदिवासी विकास भवन, तळोदा येथे दुपारी 2 वाजता ” उज्ज्वल भारत -उज्ज्वल भविष्य” महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांत ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार मार्फत मागील ८ वर्षात ऊर्जा विभागामार्फत राबविलेल्या विविध विकास योजनांच्या माहिती व जनजागृती या महोत्सवात देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे