बांधकाम समिती दीपक दिघे, महिला व बालकल्याण कल्याणी मराठे, शिक्षण ज्योती पाटील, पाणी पुरवठा कैलास पाटील व आरोग्य समितीत शारदा ढंडोरे
नंदुरबार (जगदीश ठाकुर)-
नंदुरबार नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. बांधकाम सभापतीपदी दीपक दिघे, महिला व बालकल्याण सभापतीपदी कल्याणी अर्जुन मराठे, शिक्षण सभापतीपदी ज्योती पाटील, पाणी पुरवठा सभापतीपदी कैलास पाटील तर आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी शारदाबाई ढंडोरे यांची निवड करण्यात आली आहे.
नंदुरबार नगरपालिकेत विषय समिती सभापतींची एका वर्षांनी निवड करण्यात येते. मावळत्या सभापतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आज मंगळवारी नगरपालिकेत निवड निवड प्रक्रियेसाठी सभा घेण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्षा भारती राजपूत, मुख्याधिकारी भीमराव बिक्कड आदी उपस्थित होते. पाच विषय समितींच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली. बांधकाम सभापतीपदी दीपक प्रभाकर दिघे, महिला व बालकल्याण सभापतीपदी कल्याणी अर्जुन मराठे, शिक्षण सभापतीपदी ज्योती पाटील, पाणीपुरवठा सभापतीपदी कैलास पाटील, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी शारदाबाई प्रकाश ढंढोरे आणि स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी व व नियोजन सभापतीपदी उपनगराध्यक्षा भारती अशोक राजपूत यांची निवड झाली. यावेळी नवनियुक्त सभापतींचे अधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवकांनी कौतुक केले. तसेच माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्षा भारती राजपूत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी नवनियुक्त सभापतींचा सत्कार केला. यावेळी निवडून आलेल्या सभापतींच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल-ताशांचा गजर करीत जल्लोष केला.