नंदुरबार : मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार विभागामार्फत जिल्ह्यातील शिवण मध्यम प्रकल्प, कोरडी मध्यम प्रकल्प,नागन माध्यम प्रकल्प, लघु पाटबंधारे योजना या चारही प्रकल्पातुन नदी व कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सिंचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता वि.गं. खैरनार यांनी केले आहे.
शिवण मध्यम प्रकल्पातून विरचक, बिलाडी, सुंदर्द, खामगाव, नारायणपुर, करणखेडा, बद्रिझिरा, गुजरभवाली, राजापूर, व्याहूर, धुळवद, ढेकवद, बालआमराई, काळंबा या गावांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. या गावातील शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरुन देण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक के.डी.बागुल (भ्रमणध्वनी 7769859387) यांच्याशी संपर्क साधावा.
नागन मध्यम प्रकल्पातून नवागाव, दुधवे, सोनारे, तारपाडा, देवळीपाडा,भरडू, महालकडू या गावासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. या गावातील शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरुन देण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आर.आर.पाटील (भ्रमणध्वनी 9657573915) यांच्याशी संपर्क साधावा.
कोरडी मध्यम प्रकल्पातून पळशी, पळसुन, डोंग, सागाळी, वडदा, खातगांव, वडफळी, बिलदा, जामदा, मळवाण, खडकी, छिर्वे, चोरविहीर, कडवान, वडसात्रा, चितवी या गावात पाणी सोडण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आर.जी.शिंदे (भ्रमणध्वनी 9890298318) यांचेशी संपर्क साधावा. लघु पाटबंधारे योजना भुरीवेल प्रकल्पातून भुरीवेल, धुवा, आमपाडा या गावात पाणी सोडण्यात येणार आहे. या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरुन देण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी आर.झेड गावीत (भ्रमणध्वनी 9423313688) यांच्याशी संपर्क साधावा.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचे पाणी अर्ज भरून संबधित कर्मचाऱ्याकडे जमा करावेत. हे अर्ज गावातच नियुक्त कर्मचाऱ्याकडून भरून घेतले जातील. ग्रामपंचायतींनीदेखील पाणी मागणी अर्ज भरुन नियुक्त कर्मचाऱ्याकडे पाठवावेत.