नंदुरबार(प्रतिनिधी) :- संचारबंदी दरम्यान व्यवसाय बंद झाल्याने दोन वेळेच्या जेवणाचे वांदे झालेल्या देहविक्री करणाऱया महिलांना पोलीस दलाने मदतीचा हात दिला आहे. पोलीस कर्मचाऱयांना मिळालेल्या बक्षीस रक्कमेतुन त्याना आठ दिवस पुरेल इतका शिधा पोलीस दलानं देत या देहविक्री करणाऱया महिलांना आधार दिला आहे. या उपक्रमाने देहविक्री करणाऱया महिला चांगल्याच भारवल्या असुन एरवी कारवाई करणारे पोलीसच आज संकटसमयी मदतीला धावुन आल्याने या मदतीने देहविक्री करणाऱया महिला भारवुन गेल्या होत्या. संचारबंदी आधी दिवसाकाठी तीनशे चारशे रुपयांची कमाई करुन मुला बाळांचा उदरनिर्वाह होत होता. मात्र संचारबंदीनंतर गरज संपल्यासारखे आपल्याला दुर्लक्षीत करत कोणीही मदतीस आलेच नसल्याचे यावेळी देहविक्री करणाऱया महिलांनी सांगितले आहे.