नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे दुचाकी वाहनांसाठी वाहन 4.0 या संगणक प्रणालीवर स्वंयचलित नविन नोंदणी मालिका सुरु होणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
ज्या वाहनधारकांना त्यांच्या दुचाकी वाहनांकरीता आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक घेवू इच्छितात अशा वाहनधारकांनी 24 एप्रिल 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावे. ‘प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य’ या धर्तीवर अर्जदारास त्यांच्या पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. एका क्रमांकासाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लिलावाद्वारे तो नोदणी क्रमांक संबधीतास देण्यात येईल. नागरीकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. बिडकर यांनी केले आहे.