नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): अन्न सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत नंदुरबार येथे उन्हाळी मोहिमेत जिल्ह्यातील आईसक्रिम उत्पादक व थंड शितपेय अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या मे.वाय.एल फुड प्रॉडक्टस,शहादा,मे.तमन्ना पान आणि कोल्ड्रीक्स, नंदुरबार, मे.नानक परमानंद मुलाणी,नंदुरबार, मे. भरकादेवी आईसक्रिम पार्लर, होळ तर्फे हवेली, नंदुरबार, मे.वृंदावन मिल्क प्रॉडक्स,कोटमाळ ता. नवापूर, मे.महाराजा बॉटलिंग प्लँट, शहादा, मे.श्र्वेता डिस्ट्रीब्युटर्स,नंदुरबार या शितपेय विक्री करणाऱ्या आस्थापनाकडून लस्सी, सोडा वॉटर, थंड शितपेय, त्रुटी फुटी, पॅकेज ड्रिंकींग वॉटर, आईसक्रिम, कुल्फी या थंड पदार्थाचे 12 नमूने घेण्यात आले असून सर्व नमूने प्रयोगशाळेत विश्लेषणाकरीता पाठविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर सदर आस्थापनावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारची नियमित कारवाई जिल्ह्यात करण्यात येणार असल्याचेही अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.