मुंबई (वृत्तसंस्था):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या 17 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत लागू करण्यात आला असला तरी देशातील सर्व जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 4 मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील केश कर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. आता आणखी एक मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे. रेड झोनमध्ये सुद्धा दारुविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, पुण्यातील तसेच कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी यासंदर्भात माहिती दिली. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र) राहणाऱ्या मद्यप्रेमींना मात्र तूर्तास आणखी काही काळ वाट पहावी लागेल.
मात्र असे असले तरी रेड झोनमध्ये असलेले सलूनचे दुकानं उघडण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच तीनही क्षेत्रातील बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून 6 फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. कोरोनाच्या संकटात संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्यानं सरकारचा मोठा महसूल बुडत असल्यानं मद्यविक्रीची दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेड झोनमध्येही काय सुरु राहणार?
- मद्यविक्री दुकानं
- क्लिनिक, ओपीडी
- फोर व्हिलर (1+2)
- टू व्हिलर (1 जण)
- शहरी उद्योग
- इतर दुकानं एका लेनमध्ये फक्त पाच
- अत्यावश्यक वस्तूंच्या ई-कॉमर्स सुविधा
- खासगी ऑफिस – 33 टक्के कर्मचाऱ्यांसह
- सरकारी ऑफिस – 33 टक्के कर्मचाऱ्यांसह
- कुरिअर, पोस्टल ऑफिस
- बँक आणि फायनान्स
- शेतीला परवानगी
रेड झोन (14) :
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव
ऑरेंज झोन (16) :
रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड
ग्रीन झोन (6) :
उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा