नंदुरबार (प्रतिनिधी) :- डॉ. रमेश गोकुळ चौधरी, वरिष्ठ अधिव्याख्याता ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मार्फत शिक्षणशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पी.एचडी) पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. रमेश चौधरी यांनी”अ स्टडी ऑफ टीचर्स एटीट्यूड टूवर्ड्स युजिंग न्यू टेक्नॉलॉजी अँड युजिंग सायबर रिसोर्सेस विथ स्पेशल रेफरन्स टू डिजिटल स्कूल.” या विषयावर संशोधन केले असून डॉ. राहुल गोपीचंद सनेर सहाय्यक प्राध्यापक श्रीमती एच. आर.पटेल महिला कला महाविद्यालय शिरपूर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एस.टी. भूकन ,सिनेट सदस्य डॉ.गजानन पाटील , यांच्यासह धुळे डायट प्राचार्य डॉ.मंजुषा क्षीरसागर ,वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.जयप्रकाश पाटील ,डॉ.राजेंद्र महाजन ,डॉ.शिवाजी ठाकूर ,डॉ.वनमाला पवार यांनी अभिनंदन केले.