नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा परीषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम सुरू प्रारुप मतदार यादी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयातील सूचना फलक, निवडणूक विभागातील ग्रामपंचायत व गावातील चावडीवर 5 एप्रिल 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या प्रयोजनासाठी 15 जानेवारी 2021 ही तारीख् अधिसूचीत करण्यात आली असून या तारखेस अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादीवर आधारीत संबंधित निवडणूक विभाग, निर्वाचक गणात निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या प्रारुप मतदार यादीवर 12 एप्रिल 2021 पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत.
प्राप्त हरकती व सूचना लक्षात घेऊन 20 एप्रिल 2021 रोजी जिल्हा परीषद व पंचायत समितीमधील रिक्त पदांच्या निवडणुकांकरीता प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच त्यावरून 27 एप्रिल 2021 रोजी मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी कळविले आहे.