नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मागासवर्ग प्रवर्गामधून निवडून आलेल्या 11 जिल्हा परिषद सदस्यांचे आणि 14 पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व तसेच सदस्यत्व या नात्याने धारण करीत असलेले जिल्हा परिषद, पंचायत समिती व त्याअनुषंगाने इतर प्राधिकरणावरील सदस्यत्व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी 4 मार्च 2021 पासून पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केले आहे.
जिल्हा परिषदेमधुन निवडून आलेले सदस्य कामे भूषण रमेश (8-खापर), चौधरी कपिलदेव भरत (9-अक्कलकुवा), पाटील अभिजीत मोतीलाल (24-म्हसावद ), पाटील जयश्री दिपक (29-लोणखेडा), पाटील धनराज काशिनाथ (31-पाडळदे बु), सनेर शालिनीबाई भटू (35-कहाटुळ), भारती योगिनी अमोल (38-कोळदे), पाटील शोभा शांताराम (39-खोंडामळी), ॲड. राम चंद्रकांत रघुवंशी (40-कोपर्ली), शिंत्रे शकुंतला सुरेश (41-रनाळा), पाटील रुचिका प्रविण (42-मांडळ ).
पंचायत समितीमधुन निवडून आलेले सदस्य बोरसे विजयता दिलीप (16-कोराई ), पाटील वैशाली किशोर (49-सुलतानपूर ), चौधरी विद्या विजय (51-खेडदिगर), साळुंखे सुषमा शरद (53-मंदाणे), याईस श्रीराम धनराज (58-डोंगरगाव), पाटील कल्पना श्रीराम (59-मोहिदे तह), पाटील रविद्र रमाकांत (61-जावदे तबो ), पाटील योगेश मोहन (62-पाडळदे ब्रु), पाटील शिवाजी मोतीराम (66- शेल्टी), परदेशी धमेंद्रसिंग देविसिंग (73-गुजरभवाली), पाटील लताबेन केशव (74-पातोंडा), मराठे दिपक भागवत (76-होळ तर्फे हवेली), राठोड अनिता अशोक (85-नांदर्खे ), माळी सीमा युवराज (87 गुजरजांभोली) असे आहेत.