नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय कर्मचाऱ्याविरुध्द प्राप्त होणारे तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली 8 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 12 वाजता जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निमुर्लनाची त्रैमासिक समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.