नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, बालाजी क्षीरसागर, बबन काकडे , महेश सुधळकर, तहसिलदार उल्हास देवरे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.