नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.शिवहरी ठाकरे आणि डॉ. दिपाली पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोरोना स्वॅब तपासणी शिबिरात 122 व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात आली.
कोरोना संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी अधिकाधिक स्वॅब चाचणीवर भर देण्यात येत आहे. कोठली येथील शिबिरासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल डॉ.ठाकरे यांनी नागरिकांना धन्यवाद दिले आहेत. कोरोना आजाराची लक्षणे असल्यास नागरिकांनी जवळच्या स्वॅब चाचणी केंन्द्रात जाऊन तपासणी करुन आरोग्य पथकाला तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
स्वॅब तपासणीसाठी आरोग्य सेवक संतोष कुयटे, परिचारीका सी.एस.गावीत, एल.जी.माळी, एस. एस. वळवी, योगेश वसावे यांनी सहकार्य केले.